प्रभाग १३ चा कौल विकासाला! ‘हा आमचा नव्हे, तर प्रभागातील प्रत्येक कुटुंबाचा विजय’; नवनियुक्त नगरसेवकांचा निर्धार!

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

शिवसेना (शिंदे गट) विजयी उमेदवार आफ्रीन होडेकर आणि सुहेल साखरकर यांचा विजयाचा हुंकार

“प्रभाग १३ मधील जनता हे आमचे कुटुंब आहे. नगरसेवक पदाच्या रूपाने मतदारांनी आमच्या खांद्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडू. या प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि कायापालट करणे हेच आमचे मुख्य ध्येय असेल,” अशा शब्दांत नवनियुक्त नगरसेविका सौ. आफ्रीन होडेकर आणि नगरसेवक श्री. सुहेल साखरकर यांनी आपला विजय जनतेला समर्पित केला.
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १३ कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. या अटीतटीच्या लढतीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत बाजी मारली. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर ‘स्टार न्यूज कोकण’ शी विशेष संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नेतृत्वावर विश्वास आणि जनतेचा पाठिंबा

या यशाबद्दल बोलताना नगरसेविका सौ. आफ्रीन होडेकर म्हणाल्या, “आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवणारे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, रत्नागिरीचे लाडके पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने या विजयाद्वारे शिक्कामोर्तब केले आहे.”

ही तर जनसेवेची पोचपावती – सुहेल साखरकर

नगरसेवक सुहेल साखरकर यांनी या विजयाचे वर्णन ‘कामाची पावती’ असे केले. ते म्हणाले, “आजवर प्रभागात धावून जात केलेली कामे आणि जनतेशी ठेवलेला जिवंत संपर्क, याचीच ही प्रचिती मतदारांनी दिली आहे. मतदारांनी दाखवलेला हा विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. विकासाची ही गंगा अशीच अखंड सुरू राहील. हा विजय माझ्यावरील जबाबदारी वाढवणारा असून, आगामी काळात प्रभागाचे प्रश्न सोडवण्यास आमचे प्राधान्य असेल.”

कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ

या विजयाचे श्रेय त्यांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सहकाऱ्यांना दिले. यामध्ये माझ्या गावातील व माझ्या वार्डातील पुढारी मंडळी त्याचप्रमाणे नुरुद्दीन पटेल, शब्बीर वस्ता, मजहर मुकादम, इम्रान मुकादम, समद मिरकर, ताबीश साखरकर यांच्यासह गावातील आणि प्रभागातील प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेल्या मेहनतीबद्दल दोन्ही लोकप्रतिनिधींनी त्यांचे विशेष आभार मानले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *