रत्नागिरी :
मच्छीमार नौकांना गेल्या दोन महिन्यांपासून पुरेशी मासळी मिळत नाही. अजूनही तीच परिस्थिती असून रविवारी सुद्धा मासळीचे दर वधारलेलेच होते. दर वर्षी एप्रिल महिन्यात मासळीचा ‘रिपोर्ट’ समाधानकारक असतो. परप्रांतीय नौकांशी रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात होणारी घुसखोरी आणि फेब्रुवारी, मार्च महिन्यात समुद्रातील बदलामुळे होणाऱ्या माशांच्या स्थलांतरामुळे मासळी पुरेश्या प्रमाणात मिळत नाही.
परप्रांतीय नौकांची जाळी समद्राच्या तळा पासून पृष्ठभागा पर्यंतचा मासा पकडतात. त्यात माशांचे स्थलांतर होत असल्याने स्थानिक मच्छीमार नौकांना खर्चा इतकीही मासळी गेल्या काही महिन्यांपासून मिळत नाही. वातावरण आणि समद्रातील बदलामुळे स्थलांतरीत झालेला मासा एप्रिल महिन्यात पुन्हा येतो, असा दर वर्षीचा अनुभव आहे, त्यामुळे एप्रिल महिना सुरू झाल्या नंतर माशांचा रिपोर्ट चांगला मिळेल, अशी मच्छीमार नौका मालकांना अशा होती, ती फोल ठरली आहे. मासळी अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचे दर अजूनही उतरलेले नाहीत.