Saturday, April 19, 2025
HomeNewsटेनिस क्रिकेटचा थरार अनुभवायला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदान बऱ्याच वर्षांनी पुन्हा...

टेनिस क्रिकेटचा थरार अनुभवायला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदान बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा दिमाखात सज्ज

रत्नागिरी (दि.3जानेवारी):
ओम साई स्पोर्टस् आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला  प्रारंभ होत असून 5जानेवारी पर्यंत स्पर्धा चालणार आहे.या स्पर्धेत जिल्ह्यातील 24 संघांनी सहभाग घेतला असून,टेनिस क्रिकेट मधील रत्नागिरी जिल्ह्यातील दिगग्ज खेळाडूंचा खेळ अनुभवायला मिळणार आहे.दर दिवशी सकाळी 9 वाजता सुरू होणाऱ्या खेळात 6 सामने होणार आहेत.क्रिकेट रसिकांना 3 दिवस क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या पिचसाठी आयोजकांनी खास मेहनत घेतलेली आहे.सदर पिचची पाहणी करण्यासाठी 82 वर्षाचे श्रीधर सावंत (सावंत सर) यांनी स्वतः येऊन पाहणी केली.श्रीधर सावंत( सावंत सर ) यांनी त्यांचे उभे आयुष्य हे मैदानासाठी दिलेले आहे आणि तीच आवड या वयात देखील त्यांनी जोपासली आहे आणि स्वतः मैदानाची पाहणी करून आयोजकांना काही सूचना पण केल्या. 
या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ ओम साई स्पोर्ट्सच्या 16 जानेवारी ते 21 जानेवारीमध्ये संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरेल.

RELATED ARTICLES

Most Popular