Saturday, April 19, 2025
HomeEditorialदहावीच्या बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट ६ फेब्रुवारीपासून ऑनलाईन मिळणार

दहावीच्या बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट ६ फेब्रुवारीपासून ऑनलाईन मिळणार

मुंबई:
    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा एसएससी परीक्षेचे हॉल तिकीट सोमवारी ( ६ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली आहे. राज्यातील सर्व माध्यमिक शाळांनी दहावी बोर्ड परीक्षेसाठी फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करुन देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.
      मंडळाने कळवले आहे की, शाळांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करुन देताना कोणतेही शुल्क आकारु नये, सोबतच प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकाचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत. हॉल तिकीटामध्ये विषय आणि माध्यम यामध्ये बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख या संदर्भात दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवेश पत्र गहाळ झाल्यास संबंधित विद्यालयांनी याची पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत किंवा डुप्लिकेट कॉपी असा शेरा मारावा.
    एसएससी बोर्डाच्या परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार असून २५ मार्च रोजी शेवटचा पेपर असणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजल्यापासून हॉल तिकीट उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular