Saturday, April 19, 2025
HomeNewsनाहीतर कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा

नाहीतर कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा

रत्नागिरी दि.२७आॅगस्ट: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका पूर्ण होणे अवघड आहे. पहिले रस्ता करा, नाहीतर तुमच्या कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.

रविवारी (२७ आॕगस्ट) मनसेने रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते वांद्री दरम्यान पदयात्रा काढली. देशपांडे यांच्या भाषणाने या टप्प्यातील यात्रेची सांगता करण्यात आली.

आम्ही लोकांचं काम करतोय, हे आमच्या घरचं काम नाही. त्यामुळे पोलिसांनी सहकार्य करावे, आसेही त्यांनी ठणकावले. मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुम्हाला भ्रष्टाचार करण्यासाठी इथे पाठवले का, असा प्रश्न करत आपल्या जाहीर भाषणात देशपांडे यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला.

महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसेने अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा सुरू केली आहे. त्याचे वेगवेगळे टप्पे करण्यात आले आहेत. त्यातील निवळी ते वांद्री पदयात्रा संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular