Saturday, April 19, 2025
HomeNewsज्या ट्रॉफीसाठी भारतीय रडले, तिच्या स्वागतासाठी ऑस्ट्रेलियात 4 लोकही नाही जमले

ज्या ट्रॉफीसाठी भारतीय रडले, तिच्या स्वागतासाठी ऑस्ट्रेलियात 4 लोकही नाही जमले

मुंबई : भारतात काही दिवसांपूर्वी क्रिकेटचे वारे वाहात होते. जे रविवारी फॅनलनंतर अखेर संथावलं. कारण या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच न हारलेली टीम इंडयाने अखेर ऑस्ट्रोलियासमोर मॅच हारली.

ज्यामुळे 2023ची वर्ल्ड कप ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या नावे झाली.

मॅच हरल्यानंतर अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या कारण क्रिकेट म्हणजे भारतासाठी एक खेळ नाही तर त्यांच्या भावना आहे. ज्यासाठी अनेक भारतीय वेडे आहेत. याचं उदाहरण देखील आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. भारत मॅच जिंकावी यासाठी अनेकांनी हजारो रुपयांचे तिकीट काढून मॅच पाहिली तर काहींनी अगदी देवाला पाण्यात ठेवलं. काहींनी तर देवाची पूजा, होम हवन केलं. पण असं सगळं करुन देखील भारत ही मॅच हारली.

ट्रॉफी भारताची झाली नाही म्हणून अनेकांच्या भावना दुखावल्या कारण ती ट्रॉफी भारतासाठी खूपच महत्वाची होती. पण ज्यांच्याकडे ही ट्रॉफी गेली त्या लोकांनी या ट्रॉफी प्रती असलेली इज्ज दाखवून दिली. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू मेशल मार्श देखील ट्रॉफिवर पाय ठेवून काढलेल्या फोटोमुळे बराच ट्रोल झाला आहे.

त्यात आला ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कॅमिन्स ट्रॉफी घेऊन विमानतळावर पोहोचल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या देशाच वर्ल्ड कप घेऊन पोहोचला तेव्हा त्याचं स्वागत कशा पद्धतीनं झालं हे पाहू शकता. भारतासाठी सर्वस्व असलेली असलेली ट्रॉफी घेऊन जेव्हा पॅट कॅमिन्स त्याच्या देशात गेला तेव्हा तेथे 4 ते 5 स्पोर्ट्स जर्नलिस्ट त्याच्या स्वागतासाठी आले होते. जे फक्त त्याचे फोटो घेत होते. विमानावरील इतर लोकांनी तर या सगळ्याला इग्नोर करत आपली कामे सुरुच ठेवली. ज्यामुळे हा व्हिडीओ बराच चर्चेत आला.

भारतासाठी सर्वस्व असलेल्या या ट्रॉफीचं ऑस्ट्रेलीयामध्ये अशापद्धतीनं स्वागत होणं अनेकांना पटलेलं नाही. ज्यामुळे या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. भारताने जर ही ट्रॉफी जिंकली असती तर संपूर्ण देशात उत्साह, जल्लोष आणि दिवाळी साजरी झाली असती. पण ऑस्ट्रेलियात तर कोणी स्वगतासाठी ही आलं नाही ही आश्चर्यचकीत करणारी गोष्ट आहे.

RELATED ARTICLES

Most Popular