Saturday, April 19, 2025
HomeNewsकै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचा कु. सार्थक देसाई महाराष्ट्र संघात निवड

कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचा कु. सार्थक देसाई महाराष्ट्र संघात निवड

रत्नागिरी :
बीसीसीआयच्या अंतर्गत होणाऱ्या १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धांकरिता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र संघासाठी कु. सार्थक देसाई याची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड केली आहे. कु. सार्थक देसाई हा रत्नागिरीच्या कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचा (सीडीसीए) खेळाडू असून त्याला प्रशिक्षक दीपक देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या आंतर जिल्हा निमंत्रितक क्रिकेट स्पर्धेत एक शतक व सुपर लिग स्पर्धेत सार्थक देसाई याने सलग दोन शतके झळकावली आहेत. तसेच त्याने ऑफ स्पिन गोलंदाजीचे जोरावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या तत्पूर्वी झालेल्या स्पर्धेत २० विकेटस् घेतलेल्या आहेत.

महाराष्ट्राचा संघ आंध्रप्रदेश येथे दिल्ली संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी रवाना झाला आहे. सार्थक देसाई हा रा. भा. शिर्के प्रशालेचा विद्यार्थी आहे. त्याच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. किरणशेठ सामंत, कार्याध्यक्ष बाळू साळवी, उपाध्यक्ष श्री.दीपक मोरे, सचिव श्री. बिपिन बंदरकर, सहसचिव बलराम कोतवडेकर, मनोहर गुरव व अमित लांजेकर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
    महाराष्ट्राच्या १४ व १६ वर्षाखालील संघासाठी खेळलेला आदित्य शिंदे, गोवा रणजीसाठी खेळलेला अर्चित शिगवण व आता सार्थक देसाई अशा तऱ्हेचे रत्नागिरी जिल्ह्याला दर्जेदार क्रिकेटपटू घडवून दिले आहेत. त्याबद्दल रत्नागिरीकरां कडून देखील अॅकॅडमीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे. याबद्दल अॅकॅडमीचे अध्यक्ष श्री. गजेंद्रशेठ पाथरे यांनी आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular