IPL ही जगातील सर्वात श्रीमंत T20 लीग म्हणून ओळखली जाते. IPL इतके मनोरंजन इतर कोणत्याही लीग मध्ये नाही. या लीग मध्ये केवळ क्रिकेट ॲक्शनच नाही तर नृत्य आणि संगीतही पहायला मिळते. प्रत्येक चौकार आणि षटकारवर चीअरलीडर्स नृत्य करतात, ज्यामुळे सामने पाहायची मज्जा अजून येते.ipl मध्ये सहभागी होणारे चीअरलीडर्स कुठून येतात? त्यांना पगार किती? ते एका हंगामात किती कमावतात? चला जाणून घेऊया एका सामन्यासाठी किती पैसे दिले जातात, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या…
सर्व चीअरलीडर्स युरोपातील छोट्या-मोठ्या शहरांतील असून एजन्सीं मार्फत आयपीएल मध्ये येतात. लीग मध्ये येणाऱ्या चीअरलीडर्सना पॅकेज दिले जाते. त्यानुसार त्या काम करतात. त्यांना जास्तीत जास्त 20 हजार डॉलर्सचे पॅकेज दिले जाते. भारतीय चलनात ही रक्कम 17 लाख रुपयां पर्यंत आहे.
पॅकेज व्यतिरिक्त, चीअरलीडर्सना पगारासह पार्टी परफॉर्मन्स बोनस आणि एलिमिनेटर बोनस वेगळा दिला जातो. जेव्हा संघ अंतिम फेरीत पोहोचतो तेव्हा संघासाठी काम करणाऱ्या चीअरलीडर्सना वेगळा बोनस दिला जातो.