बारामती:
लोकसभा निवडणुकी साठी बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मेरोजी मतदान पार पडले. दरम्यान मतदान झाल्यानंतर मतदारसंघातईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे आज सकाळ पासून बंद पडल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षानेकेला आहे. तसेच त्यांनी याबाबतची तक्रारही दाखल केलीआहे. सुप्रिया सुळे यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगा तक्रार केली होती. तक्रारी नंतर तब्बल 45 मिनिटेबंद झालेले सीसीटीव्ही पुन्हा सुरू झाले आहेत. दरम्यान बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदानझाले होते. तर याची मतमोजणी 4 जूनला होणार आहे. तोपर्यंत याईव्हीएम मशिन्स बारामतीतील विधानसभा मतदारसंघ गोदामात म्हणजेच स्ट्रॉग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान आज सकाळीराष्ट्रवादीचे (शरद पवार) लक्ष्मीकांत खाबिया यांना ईव्हीएम ठेवलेल्यागोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळले. त्यानंतरत्यांनी काहीतरी काळंबेरं होण्याची शक्यता वर्तवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेतआयोगाकडून हे कॅमेरे सुरू करण्यात.