Saturday, April 19, 2025
HomeNewsपदवीधर मतदार नोंदणी साठी 14 मे 2024 पासून पुन्हा काही दिवसांसाठी मुदत...

पदवीधर मतदार नोंदणी साठी 14 मे 2024 पासून पुन्हा काही दिवसांसाठी मुदत वाढ .

निवडणूक कार्यक्रम जाहीर होई पर्यंत मुदतवाढ


मुंबई :
ऑनलाईन पदवीधर मतदार नोंदणीसाठी https://gterollregistration.mahait.org येथे क्लिक करून त्वरित अर्ज भरा

कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई विभाग पदवीधर मतदार संघाचा  निवडणूक कार्यक्रम  पुढे ढकलण्यात आला  असल्याने नाव नोंदणी साठी  पदवीधर मतदारांना काही  दिवसांसाठी सुवर्णसंधी.

  ज्या  पदवीधर  मतदारांनी नोंदणी केली नसेल,  त्यांनी  घरबसल्या  किंवा  त्यांच्या  कार्यालयात ऑनलाईन पदवीधर मतदार नोंदणी किंवा ऑफलाईन पदवीधर मतदार नोंदणी करता येणार

   पदवीधर मतदार नोंदणी निवडणूक आयोग निवडणूक  कार्यक्रमाची पुढील तारीख जाहीर होईपर्यंत तथा पुढील सूचना  येईपर्यंत पदवीधर मतदार नोंदणी सुरु!!

  कोकण विभाग(ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग हे जिल्हे) आणि मुंबई (मुंबई शहर, मुंबई उपनगर हे जिल्हे- मुंबई महानगर पालिकेतील सर्व शहरे)
१) मतदार नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक-१८ सोबत जोडावयाची  खालील कागदांच्या झेरॉक्स (नकलप्रती आवश्यक)
२)ज्यांचे वय १८ पूर्ण आहेत ते व्यक्ती व दि. १.११.२०२० पूर्वी ज्यांचे Graduation/ पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती या मतदार म्हणून नाव नोंदवू शकता त्यानंतर पदवीधर झाला असेल त्यांनी फॉर्म भरू नये.

अ ) पदवी मार्कशिट किंवा convocation प्रमाणपत्र किंवा समकक्ष पदवी, (BED,पोस्ट ग्रॅज्युएट पदविका,उच्च पदवीआदी) यापैकी एक.
ब ) ओळखपत्र :-आधार कार्ड, किंवा निवडणूक ओळखपत्र, किंवा पासपोर्ट यापैकी एक.
क)  निवासाचा पुरवा :- वाहनचालक परवाना,रेशन कार्ड,लाईट बिल,बँक किंवा पोस्ट खात्याचे बचत खाते, MTNLदेयक,पाणी /प्रॉपर्टी/ गॅस जोडणीचे देयक,यापैकी एक.
ड) नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा राजपत्र (गॅझेट) कॉपी किंवा PAN कार्ड किंवा संबंधित कायदेशीर पुरावा.
इ ) एक पासपोर्ट साइज कलर फोटो.
फ ) सर्व झेरॉक्स वर स्वतःची सही करावी.

   सर्व कागदपत्रे पदनिर्देशित / राजपत्रिक अधिकारी / नोटरी यांच्याकडून अधिप्रमाणित करून फॉर्म क्रमांक १८ सोबत जोडणे किंवा ऑनलाईन प्रक्रियेसाठी वेबसाइटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

  (राजपत्रित अधिकारी तहसीलदार,नायब तहसीलदार, पोस्टमास्तर आदी राज्यशासन किंवा केंद्रशासन यांचे राजपत्रिक अधिकारी)
३) मागील कोकण किंवा मुंबई विभाग पदवीधर मागील निवडणुकीत जुन्या मतदार यादीत मतदार असलेल्या मतदारांनी सुद्धा तसेच मुंबई विद्यापीठात मतदार असलेल्यानी या मतदारसंघासाठी पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.

३) पदवी ही देशात कोणत्याही राज्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक फक्त निवासाचा पत्ता हा कोकण किंवा मुंबई पदवीधर मतदार संघातील आवश्यक
४) पदवीधर मतदार अर्ज कुठे भरणार
ऑफलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेत प्रत्यक्ष अर्ज भरून (हार्डकॉपी) जवळच्या तहसील कार्यालय/ उपविभागीय कार्यालय येथे जमा करू शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता.

अधिक माहिती साठी
मुख्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/forms.aspx हे बघावे  

RELATED ARTICLES

Most Popular