रत्नागिरी :
रत्नागिरी जेट्स Vs कोल्हापुरी टस्कर्स या सामन्याचे थेट प्रक्षेपण 30 फूट बाय 15 फूट च्या एलईडी वॉलवर करण्यात येणार आहे. हा फॅन पार्क 2 जून ला संध्याकाळी 7 वाजता उद्यमनगर येथील एम डी नाईक हॉल ला होणार आहे.
क्रिकेटचा रोमांच आपल्या कट्टर क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने फॅनपार्क हा एक महत्त्वाचा दुवा आहे. येथे प्रेक्षकांच्या सोयीसाठी खानपानाचे स्टॉल सुद्धा असणार आहेत.
तसेच यामध्ये ही लकी ड्रॉ ही काढण्यात येणार असून विनर ला फायनल मॅच ची तिकीट ही देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकानी दिली. क्रिकेट प्रेमीने व नागरिकांनी उपस्थिती राहण्याचे केले आवाहन करण्यात आले आहे.