Saturday, April 19, 2025
HomeSportsएन. एस. चॅम्पियन ट्रॉफी कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने जिंकली, सार्थक देसाईचे...

एन. एस. चॅम्पियन ट्रॉफी कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने जिंकली, सार्थक देसाईचे दुसरे झंझावती शतक

रत्नागिरी :

कोळंबे येथील सावंत (सोसा) स्टेडियमवर एन. एस. क्लब नवी मुंबई, सांगली क्रिकेट क्लब व कै. छोटूदेसाई क्रिकेट अॅकॅडमी, रत्नागिरी या संघांमध्ये टी-२० लीग तिरंगी क्रिकेट स्पर्धा गेली चार दिवस आयोजित करण्यातआली होती. सदर स्पर्धेमध्ये कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने सांगली क्रिकेट संघाचा दोनदा पराभव करून अंतिम फेरीतप्रवेश केला व नवी मुंबई संघाने सांगली संघाचा पराभव केल्यामुळे अंतिम सामना कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी वएन.एस. क्लब नवी मुंबई यांचेमध्ये झाला. सदर सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीनेवीस षटकात ३ बाद १८५ धावा केल्या. त्यामध्ये सार्थक देसाई याने सलग दुसरे झंझावती शतक झळकावले. त्यामध्येपाच चौकार व ११ षटकारांची आतिष बाजी केली. त्याला अनुज देसाई याने ३० धावा करून मोलाची साथ दिली.एन.एस. क्लब नवी मुंबई यांचेकडून गोलंदाजी करताना त्यांच्या सूर्यवंशी – १, सणस – १ व भाविन देसाई – १ यांनी बळीघेतले. सदर ॲकॅडमीच्या धाव संख्येला प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या एन. एस. क्लब नवी मुंबई यांनी सर्व गडी बाद ९० धावाकेल्या. त्यामुळे कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने ९५ धावांनी सदरचा अंतिम सामना जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.एन. एस. क्लब नवी मुंबई यांचेकडून रोनक पटेल – २९, सौराष्ट्र पटनायक – १६ व सणस व म्हारगुडे यांनी प्रत्येकी ९ धावाकेल्या. तर कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीच्या श्रेयस शिंदे – ३, सार्थक देसाई – २, किरण सुर्वे – २ व अर्णव भाटकर-१असे गडी बाद केले.अंतिम सामन्यानंतर बक्षिस वितरण समर्थ रोडलाईन्सचे श्री. गजेंद्रशेठ पाथरे, अथर्व पाथरे, हॉटेल गोपाळचे मालकव रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य श्री. लाल्याशेठ खातू, पावस येथील उद्योजक श्री. शेखरशेठ नानरकर,श्री. राजूशेठ खातू, अॅड. अजित कदम व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य श्री. सुनिल घोसाळकर यामान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिस समारंभाचे सूत्रसंचालन श्री. दीपक देसाई यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular