Saturday, April 19, 2025
HomeSportsकणकवलीच्या अक्सा शिरगांवकर हिची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड

कणकवलीच्या अक्सा शिरगांवकर हिची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड

कणकवली :
अमरावती येथे सुरु असलेल्या, महाराष्ट्र अर्चइसोसिएशन यांच्या तर्फे होत असलेल्या राज्यस्तरीय अर्चरी(तिरंदाजी) स्पर्धेत कणकवली येथील अक्सा मुद्दसर शिरगांवकर या १२ वर्षीय मुलीने १३ वर्षा खालील वयोगटा मध्ये सुवर्णपदक पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.विशेष म्हणजे अक्सा ही पहिल्यांदाच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली होती.
या यशामुळे अक्सा हिची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.अक्सा ही येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थिनी आहे.तिच्यातील तिरंदाजी खेळा मधील कौशल्य पाहून पालकांनी तिला सातारा येथील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक प्रविण सावंत यांच्या अॅकॅडमीत पाठवले. गेल्या आठ महिन्या पासून ती सातारा येथेच राहून तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत आहे.
दरम्यान अमरावती येथे सध्या महाराष्ट्र अर्चरी इसोसिएशन यांच्यातर्फे विविध वयोगटांमध्ये तिरंदाजी स्पर्धा सुरु आहेत. स्पर्धे साठी १३ वर्षांखालील वयोगटा मध्ये २०२ स्पर्धक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या वयोगटा मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अक्सा ही एकमेव स्पर्धक होती. या वयोगटात २० जणांमध्ये मुख्यस्पर्धा रंगली. अखेरीस अक्सा हिने महत्वपूर्ण लक्ष्यभेद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. दरम्यान याच स्पर्धेमध्ये ती १५वर्षांखालील वयोगटा मध्येही सहभागी झाली आहे. अक्सा ही येथील प्रतिथयश शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगांवकर व खुशबू स्वयंसहाय्यता बचतगटाच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करणाऱ्या, राज्यस्तरीय पारितोषीक प्राप्त करणाऱ्या सौ. तन्वीर शिरगांवकर यांची मुलगी आहे. या यशा बद्दल अक्सा हिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular