नवी दिल्ली :
भारतीय अल्ट्रा रनर सुफिया सूफी खानने आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. 200 किमी दक्षिण ते उत्तर ‘ फास्टेस्ट रन ॲक्रॉस कतार’ अल्ट्रामॅरेथॉन रन 30 तास 34 मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केली .
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिच्या प्रयत्नात, भारतीय प्रो ॲथलीट सुफियाने गुरुवारी अबू समरा येथून सकाळी 6.16 वाजता तिची शर्यत सुरू केली आणि शुक्रवारी दुपारी 12.50 वाजता अल रुवैस मध्ये अंतिम रेषेला स्पर्श केला. या कामगिरीची औपचारिक ओळख होण्यासाठी या मोहिमेचे संपूर्ण रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला सादर केले जातील.
सुफिया सूफीने ३५ तासांत शर्यत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते, पण तिने ते वेळेच्या खूप आधी पूर्ण केले. मोहिमेच्या एक दिवस आधी गल्फ टाईम्सशी बोलताना ती म्हणाली होती की ती कोणत्याही ब्रेक शिवाय एकाच वेळी करेल.