Saturday, April 19, 2025
HomeSportsकाय सांगता ! ७ महिन्यांची प्रेग्नंट असूनही ती ऑलिम्पिक मध्ये खेळली

काय सांगता ! ७ महिन्यांची प्रेग्नंट असूनही ती ऑलिम्पिक मध्ये खेळली

पॅरिस : ऑलिम्पिक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्ना साठी प्रत्येक खेळाडू संघर्ष करत असतो. अनेकदा परिस्थिती पुढेही हार न मानता इतरांसाठी प्रेरणा ठरतो.
अशीच एक घटना पॅरिस ऑलिम्पिक मध्येही घडली आहे. इजिप्तची महिला तलवारबाज नादा हाफिज चक्क ७ महिन्यांची गर्भवती असताना पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाली आणि लढलीही.
नादाने तिच्या राऊंड ऑफ १६ मधील सामन्या नंतर सोशल मीडियावर ती ७ महिन्यांची गर्भवती असल्याचा खुलासा केला आहे. नादाने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये महिलांच्या तलवार बाजी मध्ये पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या एलिझाबेथ तार्ताकोवस्कीला १५-१३ फरकाने पराभूत केले होते.
त्यानंतर तिचा राऊंड ऑफ १६ चा सामना दक्षिण कोरियाच्या जीऑन हायोंग विरुद्ध झाला, ज्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यातही तिने शेवट पर्यंत विजया साठी झुंज दिली होती.
यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. तिने त्यात लिहिलंय, ‘७ महिन्यांची प्रेंग्नंट ऑलिम्पियन! पोडियमवर तुम्हाला दोन खेळाडू दिसले, पण प्रत्यक्षात तिथे तीन होते. एक मी होते, एक माझी प्रतिस्पर्झी आणि अजून या जगात न आलेले माझे लहान बाळ होते.’
‘माझ्या बाळाचा आणि माझा या आव्हानाच समान वाटा आहे, मग तो शारिरीक असो किंवा भावनिक.’
तिने पुढे लिहिलं, ‘गरोदरपणातील चढउतार कठीण असतो, पण जीवन आणि खेळ यांचा समतोल राखण्या साठी संघर्ष करावा लागतो. खेळ कठीण असला, तरी तो खेळणे मोलाचे होते. मी राऊंड ऑफ १६ मध्ये माझं स्थान निश्चित करू शकले, याचा मला अभिमान आहे, हे सांगण्या साठीच मी ही पोस्ट लिहिली आहे.’
‘मी भाग्यवान आहे की माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यानेच मी इतक्या दूर पर्यंत येऊ शकले. मी तीन वेळची ऑलिम्पियन असले, तरी यंदाचे ऑलिम्पिक खास होते, माझ्या बरोबर एक छोटा ऑलिम्पिन होता.’
हाफिज हिने यापूर्वी इजिप्त कडून २०१६ साली रिओ ऑलिम्पिक आणि २०२१ टोकियो ऑलिम्पिकही खेळले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular