‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाला अवघं १९ वर्षे वय असतानाच तिच्या म्युझिक व्हिडीओतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. एका गाण्याने ती घराघरांत ओळखली जाऊ लागली.या गाण्यातून प्रसिद्धी मिळाल्यावर ती सलमान खान, प्रियांका चोप्रा व अक्षय कुमार यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातही झळकली होती. करिअरमध्ये अनेक रिअॅलिटी शो करणारी शेफाली आता ४१ वर्षांची आहे. ती अखेरची २०१९ मध्ये ‘बिग बॉस १३’ मध्ये झळकली होती.
बाळाच्या नियोजना बाबत शेफाली म्हणाली, “माझ्या व माझ्या पतीच्या वयातील अंतरामुळे मला आई होण्या साठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आम्ही सर्व प्रयत्न करून थकलो आहोत. आता वाटतं की जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हाच आमच्या घरी नवीन पाहुणा येईल.” यानंतर पारसने तिला मुलगा हवा की मुलगी याबाबत विचारलं. त्यावर शेफालीने सांगितलं की तिला व पती परागला मुलगी हवी आहे. पण जे नशीबात असेल तेच होईल, असं तिने म्हटलं.
शेफाली जरीवाला पुढे म्हणाली, “बाळ दत्तक घेण्याच्या निर्णयात तुम्हाला पती व तुमच्या कुटुंबियांचाही पूर्ण पाठिंबा असावा लागतो. आमच्या घरात मूल दत्तक घ्यायला सगळे तयार आहेत, पण मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया इतकी लांब असते की त्या काळात मुलं मोठी होतात. प्रत्येकाला लहान मूल हवं असतं. पराग आणि मी खूप दिवसांपासून मूल दत्तक घेण्याचा विचार करत होतो, पण ते शक्य होत नाहीये. दुसरं म्हणजे माझ्या आणि परागच्या वयात खूप अंतर आहे.”
माझ्या व माझ्या पतीच्या वयातील अंतरामुळे मला आई होण्यासाठी अनेक अडचणीं, शेफाली
RELATED ARTICLES