रत्नागिरी :
रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा राजिवडा येथे माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांच्या उपस्थितीत जोर जोरात प्रचार सुरू आहे. प्रत्येक मोहल्ल्यत जाऊन मोहल्ल्यांची मीटिंग घेत आहेत. त्यावेळी सुहेल मुकादम यांच्याबरोबर राजापूर अर्बन बँकेचे संचालक अल्ताफ संगमेश्वरी व शब्बीर वस्ता मोलाची भूमिका बजावित आहेत.
राजिवडा हा मुस्लिम बाहूल्य वस्ती असलेला गांव असून एक गट्टा मते उदय सामंतांना कशी मिळतील यासाठी सुहेल मुकादम व त्यांचं सहकारी प्रयत्न करीत आहेत. सुहेल मुकादम यांचे कार्यकर्ते आदिल फणसोपकर, शौकत पावस्कर, कंमरू, मुन्तहा, निलेश जाधव, गुड्डे कोतवडेकर , इक्बाल सुवर्णदुर्गकर, नादीर भाटकर, रफिक कोतवडेकर, जाहीर सोलकर इत्यादी कार्यकर्ते त्यांच्या बरोबरीने प्रचारात सहभागी झाले आहेत. उदय सामंत हे राजिवडा गावांमधून भरघोस मते घेऊन नक्कीच विजयी होतील असे माजी नगरसेवक सुहेल मुकादम व त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत.