रत्नागिरी:
येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणारआहे. लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होवूनमच्छिमारांनी मतदान करावे. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये,आपल्या गल्लीमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी दूत म्हणूनकाम करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णीयांनी केले.
२६६-रत्नागिरी विधानसभा मतदार संघात विशेषत: मच्छिमारव्यावसायिकांमध्ये मतदार जनजागृतीसाठी आज मिरकरवाडाबंदरावर बोट रॅली काढण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णयअधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूकअधिकारी राहुल गायकवाड, तहसिलदार राजाराम म्हात्रे,मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त आनंद पालव आदींसह मच्छिमारसहकारी संस्थेचे पदाधिकारी सदस्य, व्यावसायिक मोठ्या प्रमाणातउपस्थित होते.