रत्नागिरी:
विधानसभा निवडणुक २० नोव्हेंबर रोजी होत असल्याने १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मच्छीमार नौका बंदरामध्ये ठेवण्याबाबत व मच्छीमारी संबंधित कोणतीही कामकाज न करण्याबाबत सर्व मच्छिमार सहकारी संस्थांमार्फत मच्छिमार नौका मालक यांना कळविण्यात आले आहे अशी माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव यांनी दिली.
मासळी उतरविण्याच्या केंद्रावर नेमणूक करण्यात आलेले सुरक्षा रक्षक व सागर मित्र यांच्यामार्फत मतदान दिवशी देखरेख ठेवण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व मच्छिमारी संस्थांची दूरदृश्यप्रणालीद्वारे १३ नोव्हेंबर रोजी बैठक घेवून सूचना देण्यात आलेली आहे. मतदान केल्याशिवाय कोणतीही नौका मासेमारीस जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व मच्छिमारांना अवगत करण्याबाबत कळविण्यात आले आहे.