Saturday, April 19, 2025
HomeArticleमहिलांना मिळणार FREE मोबाईल

महिलांना मिळणार FREE मोबाईल

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना पाच हप्त्याचे सरकार कडून साडेसात हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजने अंतर्गत मोफत मोबाईल देण्यासंदर्भात माहिती दिली जात आहे.
महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोफत मोबाईल फोन देण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर खूप होत आहे. या चर्चेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सध्या महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय होत चालली आहे. या योजनेला राज्य भरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 1 जुलै 2024 पासून सुरू केली आहे.
या योजनेसाठी आता पर्यंत सरकारकडे दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जात आहे. आता पर्यंत या योजनेच्या माध्यमातून पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे 7500 हजार रुपये महिलांना मिळालेले आहे.
त्याच प्रमाणे त्या FREE मोबाईल व्हिडिओ मध्ये अर्ज करण्या संदर्भात माहिती पण दिली जात आहे. या संदर्भात चौकशी केली असता सरकार कडून अशी कोणतीही योजना सुरू केली गेली नाही. आणि जर शासनाने अशी काही योजना सुरू केली असती तर त्याबाबत सरकारने शासन निर्णय काढला असता. त्या करिता महिलांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये.

RELATED ARTICLES

Most Popular