रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील कोकण नगर येथे मध्यरात्री बेकायदेशीर रित्या एकत्र येऊन जमाव निर्माण केल्या प्रकरणी पोलीस उमेश पवार यांच्या फिर्यादी वरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मध्ये
1)सागर प्रकाश कदम वय वर्ष 33 राहणार हातखंबा कदमवाडी , 2) निलेश नितीन सुर्वे वय वर्ष 21 , 3) शुभम संजय साळवी वय वर्ष 19 राहणार झाडगाव व इतर 30 ते 40 जण यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 189,( 2) 190, 191 192 (2) 196 118 (1 )37 (1) प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.