रत्नागिरी :
स्टेट बँक ऑफ इंडिया ने हज आणि उम्रा साठी जाणाऱ्या भाविकांसाठी सऊदी अरब या देशात वित्तीय व्यवहार करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जी भाविकांसाठी खूपच फायद्याची आहे.
सऊदी अरब मध्ये होणारे सर्व व्यवहारावर कोणत्याही प्रकारचा सेवा कर आकारला जाणार नसल्याने भाविकांना त्या देशातील चलन ( रियाल ) घेऊन जाण्याची आवश्यकता नाही.
ही भारतात सर्वात उत्तम सेवा देणारी बाब असून त्याची प्रसिद्धी किंवा कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी होत नसल्याने हज यात्रेकरूंना या बाबत वेळीच माहिती मिळत नाही. आणि या एका चांगल्या उपक्रमाचा जनतेला फायदा होत नाही.
त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया ने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाखां मध्ये प्रसिद्धी फळक लावून हज यात्रेकरूंना फाॅरेन ट्रावेल कार्ड तातडीने उपलब्ध करून देण्या बाबत समाजसेवक एजाज इब्जी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेल पाठवून तसेच विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे प्रत्येक्ष भेटून विनंती केली आहे.
हज यात्रे साठी जाणाऱ्या भाविकांसाठी फाॅरेन ट्रावेल कार्ड उपलब्ध करून द्यावे , एजाज इब्जी(समाजसेवक)
RELATED ARTICLES