नवी दिल्ली :
सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षभराच्या सुट्ट्यांचे नियोजन आधीच करावे लागते. त्यांवर काम आणि सुट्टी यांचा ताळमेळ कर्मचाऱ्यांना घालावा लागतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता आता एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 2025 मधील सुट्ट्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे.
सरकारकडून ऐच्छिक सुट्ट्यांकरिता 12 सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर ठरलेल्या सुट्यांची संख्या 14 आहे.
1.प्रजासत्ताक दिन
2.स्वातंत्र्य दिन
3.महात्मा गांधी यांचा जन्मदिवस
4.बुद्ध पौर्णिमा
5.ख्रिसमस
6.दसरा (विजय दशमी)
7.दिवाळी (दीपावली)
8.गुड फ्रायडे
9.गुरु नानक यांची जयंती
10.इदुल फितर
11.इदुल जुहा
12.महावीर जयंती
13.मोहरम
14.पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस (ईद -ए-मिलाद)
ऐच्छिक सुट्ट्या खालील प्रमाणे
1.दसऱ्यासाठी अतिरिक्त दिवस
2.होळी
3.जन्माष्टमी (वैष्णवी)
4.राम नवमी
5.महा शिवरात्री
6.गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थी
7.मकर संक्रांती
8.रथयात्रा
9.ओणम
10.पोंगल
11.श्री पंचमी / बसंत पंचमी
12.विशू/वैशाखी/वैशाखडी/भाग बिहू/मशादी उगदी/चैत्र सुकलादी / चेटी चांद / गुढी पाडवा / पहिला नवरात्र आणि नवरात्र / छठ पूजाकरवा चौथ.