Saturday, April 19, 2025
HomeNewsदहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयांमध्ये ३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी...

दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयांमध्ये ३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी अकरावीत प्रवेश मिळणार

मुंबई :
महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत बदल केल्याची माहिती समोर आली. विद्यार्थ्यांना यापुढे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी त्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. पंरतु, संबंधित विद्यार्थ्याच्या निकालावर एक विशेष शेरा देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रमाणपत्र घेऊन अकरावीत प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे, असे दोन पर्याय उपलब्ध असतील.
मात्र, हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत भविष्यात कोणतेही करिअर करायचे नाही. त्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही त्यांना याचा फायदा होऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांसाठी गणित किंवा विज्ञान विषयाची भीती कमी होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular