मुंबई :
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद नि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ चे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. २८/१०/२०२४ ते १०/११/२०२४ या कालावधीत उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे. दोन वर्षांपासून रखडलेल्या ‘टीईटी’ परीक्षेला (शिक्षक पात्रता परीक्षा) अखेर मुहूर्त लागला असून, राज्यभरात १० नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login
२०१३ पासून टीईटी परीक्षा सुरू करण्यात आल्या. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे आणि ‘टीईटी’ च्या बोगस प्रमाणपत्रांमुळे दोन ते तीन वर्षांपासून ही परीक्षा रखडली होती. यामुळे परीक्षेबाबत भावी शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र ही रखडलेली परीक्षा आता नोव्हेंबरमध्ये होत आहे. राज्यात एकाच वेळी नोव्हेंबरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. पेपर क्रमांक १ (पहिली ते पाचवी), पेपर क्रमांक २ (सहावी ते आठवी) होणार आहे. पेपर क्रमांक १ हा १० नोव्हेंबरला सकाळी साडेदहा ते दुपारी एक आणि पेपर क्रमांक २ हा दुपारी दोन ते साडेचार यावेळेत होणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबरला होणार आहे.