मुंबई:
ठाकरे गटाचे ५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. कालपासून हे आमदार आमच्या संपर्कात आहे. यावेळी त्यांचे बहुतेक आमदार आमच्याकडेच येतील, असे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले की, धनुष्यबाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता, तो आम्ही घेऊन आलो. गद्दारी कोणी केली, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महायुतीचे कोकणात निवडून आलेले आमदार कोकणाचा विकास करतील, याचा मला विश्वास आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणारच होती, हे निश्चित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेली विकासकामे जनतेने पाहिली आहेत. त्यामुळेच जनतेचा कौल महायुतीला मिळाला, असे ते म्हणाले.