मुंबई:
मुंबईच्या शिवाजी पार्कवर क्रिकेट गुरू रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी सचिन तेंडूलकर आणि माजी क्रिकेटर विनोद कांबळी उपस्थित होता.त्यावेळी विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला. थरथरणारे हात आणि नीट बोलताही येत नाही, अशी परिस्थिती विनोद कांबळीची झाली होती. त्यानंतर क्रिडाविश्वात खळबळ उडाली होती. अशातच आता कपिल देव यांनी विनोद कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
कपिल विनोद कांबळीचा सर्व वैद्यकीय खर्च उचलायला तयार आहेत. त्याला आर्थिक मदतही ते करणार आहेत. पण यासाठी कपिल यांनी फक्त एकच अट ठेवली आहे, असं बलविंदर संधू यांनी म्हटलं आहे. विनोदचा सर्व खर्च मी करेन, पण त्यानं स्वत:हून प्रथम रिहॅबला जायला हवं. त्यानंतर त्याच्यावरील उपचार कितीही लांबला किंवा कितीही खर्च आला, तर कपिल देव तो सर्व खर्च उचलायला तयार आहेत, असंही बलविंदर संधू यांनी म्हटलं आहे.
विनोद कांबळी दारूच्या आहारी गेल्याचं पहायला मिळलं होतं. त्यामुळे शिवाजी पार्कवरच्या कार्यक्रमात देखील विनोद कांबळी दारू पिऊन आला होता, अशी चर्चा झाली होती. पण विनोद कांबळी यांच्या लहानपणीचे मित्र मार्कस कूटो यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं, की ‘विनोद कार्यक्रमावेळी नशेत नव्हता. त्याने मागील एक वर्षापासून दारुच्या थेंबाला स्पर्शही केला नाही. तो कार्यक्रमात भावूक झाला होता, असंही मार्कस कूटो यांनी म्हटलं आहे.