राजापूर:
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनने सर्व महिलांसाठी एक विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करून त्यांचा पहिला कार्यक्रम साजरा केला.
या शिबिरात महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण, आर्थिक साक्षरता व्यवस्थापन, स्वयंपूर्णता, उद्योजकतेसाठी प्रेरणा, आणि सरकारी व खाजगी अनुदान योजनांची माहिती यांसारख्या मौल्यवान माहितीचे सत्र घेण्यात आले. या कार्यक्रमात सौ. नीलम पालव यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
अपुर्वा सामंत या आमदार भैय्या सामंत यांच्या निवडणुकित किंग मेकर ठरल्या. अपुर्वा सामंत यानी राजापुर लांजा साखरपा मतदार संघातील विकासा बाबत विशेष योजना राबवाण्यासाठी अपुर्वा किरण सामंत फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरुवात केली आहे . महिलादिनाचे निमीत्ताने महिला साठी एक विशेष मार्गदर्शन शिबिर घेउन सुरुवात केली.या फाउंडेशनच्या माद्यमातुंन पर्यावरण संरक्षण व विकास , समाज प्रबोधन , वैध्यकीय सेवा,महिला सबली करण सक्षमिकरन,गरिब व गरजुना मदत ,कृषी क्षेत्र विकास , रोजगार ,पर्यटन विकास, असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात महिलांची विशेष उपस्थिती होती .तसेच सौ. निलम पालव, श्री. विकास गंभरे (तहसीलदार राजापूर), श्री. उबाळे (पोलीस उपनिरीक्षक राजापूर), श्री. निलेश जगताप (गटविकास अधिकारी राजापूर), सौ. अर्चना भंडारी (तालुका अभियान व्यवस्थापक MSRLM ), अॅड. श्री. यशवंत कावतकर, सौ. दुर्वा तावडे, श्री. प्रकाश कोळेकर, आणि श्री. भरत लाड या मान्यवरांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम म्हणजे अपुर्वा सामंत यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी दर्शवते .