रत्नागिरी :
रत्नागिरी येथून दर्जेदार क्रिकेटपटू घडावेत व रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमींना मुंबई, पुणे, गोवा येथील खेळाडूंचा खेळ पाहावयास मिळावा, या एकमेव उद्देशाने यावर्षी रत्नागिरीतील खेळाडूंसाठी कोळंबे येथील सावंत स्टेडियमवर (सोसा) येथे दिनांक २१ मार्च ते ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यस्तरीय ‘श्री जय भैरव’ चषक खुली टी-२० सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा कै.छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीतर्फे आयोजित करणेत येत आहे.सदरची स्पर्धा ही बाद पद्धतीने खेळविली जाणार असून प्रथम प्रवेश घेणाऱ्या २० संघानाच त्यामध्ये भाग घेता येईल. स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रुपये ५०,०००/- व आकर्षक चषक व उपविजेत्या रोख रुपये ३०,०००/- व आकर्षक चषक देण्यात येणार असून स्पर्धेतील दररोजच्या सामन्या करिता ‘मॅन ऑफ दी मॅच’ चा आकर्षक चषक तसेच संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीरास, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना रोख पारितोषिक यांना आकर्षक चषके देवून गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे समर्थ रोड लाईन्स श्री. गजेंद्रशेठ पाथरे व श्री. दशरथ शेठ दाभोळकर अध्यक्ष चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन व उद्योजक श्री. रमेश कसबेकर यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.सदर स्पर्धेकरिता स्पर्धा समिती नेमण्यात आली असून यामध्ये श्री. अमित लांजेकर, श्री. लाल्या खातू, श्री. हरीशलाडे, श्री. रमेश कसबेकर, श्री. श्रद्धानंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तरी सदरची स्पर्धा ही खुल्या पद्धतीची असून या संघांना सदर स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे, त्यांनी त्यांच्या संघांची नावे श्री. पार्थ गांधी मोबा. नं. ९३५६२८३८४७ व श्री. साईप्रसाद हेरम मोबा. नं. ७४२०९०७९०९ यांचेकडे दिनांक १६मार्चपर्यंत नोंदवावीत. तसेच अधिक माहितीसाठी श्री. दीपक देसाई सचिव, मोबा. नं. ९८९०४५७९७८ यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे अध्यक्ष श्री. गजेंद्रशेठ पाथरे यांनी केले आहे.