रत्नागिरी :
शनिवार दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कोतवडे ता. रत्नागिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.मुक्तेश्वरी पाखरे , प्रतीक्षा मांडवकर , पडवी सिस्टर, पूगावकर सिस्टर, पोळेकर सिस्टर , नेहा जाधव, प्राजक्ता रसाळ, सोनाली शेलार, श्रद्धा माने, क्रांती तसेच वंदना गावडे, प्रीती कांबळे, दीपा कांबळे, युक्ता शीतप यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दीन हा ‘स्वगृही सेवा संस्था वृद्धाश्रम शिरगाव येथे जाऊन तेथील वृद्ध महिलांसोबत साजरा केला. तेथील वृद्ध आजी महिलांची आरोग्य तपासणी केली आवश्यक ती औषधोपचार केले भेटवस्तू दिली.
तेथील कामकाज या निवृत मेट्रन विना लेले या पाहतात.
या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्येf आणि उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गावडे यांनी शुभेच्छा दिल्या.