रत्नागिरी(०६ ऑगस्ट ): गेल्या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. अनेक घरांचे देखील नुकसान झाले आहे. पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यातच आता राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात सर्वच भागात पुढील आठ दिवस पाऊस जोर धरणार आहे. रायगड, रत्नागिरी,कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच मध्य महाराष्ट्र ,विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, नगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणी पुढील पाच दिवस यलो अलर्ट दिला आहे. तसेच सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मध्य-पूर्व बंगालच्या उपसागरातून ते आंध्र प्रदेशापर्यंत चक्रिय स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांनीच काळजी घ्यावी आणि सतर्क रहा