मुंबई: मुंबई आणि आसाम दरम्यान सुरू असलेल्या रणजी सामन्यात स्टार सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याने तिहेरी शतक लगावले आहे. शॉ याने सामन्याच्या पहिल्याच दिवशी दुहेरी शतक लगावत चर्चेत आला होता. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एक शतक ठोकत त्याने तिहेरी शतक पूर्ण केले आहे. पृथ्वीने ३२६ चेंडूत ३०० धावा काढल्या. त्याने त्याच्या खेळीत ३४ चौकार आणि दोन षटकार लावले आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शॉ चे हे पहिले तिहेरी शतक आहे. त्याच्या या पूर्वीचा सर्वश्रेष्ठ स्कोअर हा २०२ धावांचा आहे. एवढी मोठी धाव संख्या करणारा शॉ हा मुंबईचा आठवा फलंदाज आहे. त्याने २४० च्या पहिल्या दिवशीच्या धावसंख्ये पासून पुढे जात दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात तिसरे शतक पूर्ण केले.
आसामच्या विरोधात पहिल्या टुरनामेन्ट मध्ये शॉ चे प्रदर्शन चांगले नव्हते. मुंबईसाठी त्याने सात सामन्यात खेळत केवळ १६० रन बनवले होते. २३ वर्षीय शॉ ने त्याच्या ४१ सामन्यात प्रथम श्रेणी करियर मध्ये १२ शतक आणि १५ अर्धशतक असे मिळून तब्बल ३ हजार ३०० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत.
पृथ्वी शॉ ने जुलै २०२१ नंतर आंतर राष्ट्रीय सामना खेळला नाही. पाच टेस्ट सामन्यात ९ डावांमध्ये शॉ ने ४२.३८ सरासरीने आणि ८६.४ च्या स्ट्राईक रेटने ३३९ धावा काढल्या. शॉ च्या खात्यात एक शतक देखील आहे. तर दोन अर्धशतक त्याच्या खात्यात आहे. शॉने पहिल्या विकेट साठी मुशिर खान सोबत मिळून १२४ धावा काढत मुंबईच्या संघाची दमदार सुरुवात करून दिली. यानंतर त्याने अजिंक्य राहणे याचया सोबत मिळून ५०० धावा काढल्या. कर्णधार अजिंक्य राहणे याने सुद्धा २०० चेंडूत १०० धावा काढल्या. पृथ्वी शॉ आणि राहणे यांच्या दरम्यान तिसऱ्या विकेट साठी ४१३ चेंडूत ३०७ धावांची खेळी पूर्ण झाली आहे.