रत्नागिरी(दि.११ जानेवारी):
ओम साई स्पोर्टस् आयोजित व मा.ना. उदयजी सामंत पुरस्कृत नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ लीग स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे सोमवार दिनांक १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या आहे.
तसेच तुषार साळवी व अभिजित दुडे युवा सेना पुरस्कृत दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८.०० वा. बेस्ट ऑफ ग्रामीण विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया या बलाढ्य संघात प्रदर्शनीय सामना रंगणार आहे. या स्पर्धेत बेस्ट ऑफ ग्रामीण संघात उसमान पटेल, अंगत पाटील, आकाश तारेकर, रजत मुंडे, भुषण पाटील, सुमित धोंगडे तसेच रेस्ट ऑफ इंडिया जगत सरकार, अंकुर सिंग, मुन्ना शेख, कृष्णा सातपुते, बंटी पाटील, शाहीद शेख या खेळाडू मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल.
विजेता संघाला ५,५५,५५५ रोख रक्कम व चषक, उपविजेता संघाला ३,३३,३३३ रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील मालिकावीर याला ठाणे येथील उद्योजक नरेश शेठ भोईर यांच्याकडून टीव्हीएस रोनिन टू व्हीलर बाईक पारितोषिक म्हणून देण्यात येईल.
तसेच स्पर्धेतील उगवता तारा यांना प्रतिक जयू सावंत याज कडून २२,२२२ रोख रक्कम व चषक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ११,१११ रोख रक्कम व चषक,
प्रत्येक सामन्यातील सामनावीर यांना प्रत्येकी आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येईल.