पुणे :- (०२ अगस्ट) माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हॉकी स्टिकने हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर आहेत.या दरम्यान उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज चौकात शिवसैनिकांनी हल्ला केला. शिवसैनिकांनी गाडीच्या काचेवर जोरजोरात हॉकी स्टिक मारून काचा फोडल्या, अशी माहिती समोर आली आहे.
यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात पूरेपूर प्रयत्न केला. उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. यावेळी चौकाजवळ संबंधित घटना घडली. विशेष म्हणजे चौकाजवळच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडी बघितलं त्यानंतर हल्लाबोल केला. सामंत यांच्या गाडीचे काच फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सुदैवाने उदय सांमत यांना कोणतीही इजा झाली नाही.