माजी क्रिकेट पटू मिलिंद गुंजाळ हे प्रथम श्रेणीतील फार प्रसिद्ध असे क्रिकेटपटू आहेत. ते महाराष्ट्र संघा साठी अनेक सामने खेळले आहेत व महाराष्ट्र संघा चे पांच वर्षे कर्णधार ही राहिले आहेत. त्यानंतर ते मॅच रेफ्री आणि कोच च्या रूपात आपला योगदान क्रिकेट साठी देत आहेत त्याच बरोबर सध्या ते पुणे येथे मिलिंद गुंजाळ स्पोर्टस् अकॅडमी चालवत आहेत. त्यांच्या या अकॅडमीतून भारता साठी चांगले क्रिकेट पटू तयार होत आहेत.
मिलिंद गुंजाल हे रणजी सहीत प्रथम श्रेणीतील एकूण ८८ सामने खेळले आहेत. त्यातून त्यांनी एकूण ५४२७ धावा बनविल्या आहेत त्यात १४ शतके व २७ अर्ध शतकेआहेत त्यांनी ठोकलेल्या २०७ सर्वअधिक धावा आहेत.गोलंदाजी करतांना त्यांनी ०७ विकेट घेतले आहेत. सर्व सामन्यात एकूण ८९ झेल घेतले आहेत.एक स्टंपिंग केला आहे. लेग ब्रेक गोलंदाजीत एकूण ८४.४२ सरासरी आहे तर उत्कृष्ट गोलंदाजी ची सरासरी ०२.२२ आहे.
१९८७ साली प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराने त्यांच्या सन्मान करण्यात आला होता. शालेय स्तरावर २२ वर्षा खालील गटात आणि रणजी ट्रॉफी पातळी वर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. रणजी ट्रॉफी मध्ये सोळा वर्षे ( १९७९ते १९९३) खेळले आहेत. पाच वर्ष १९८५ ते १९९० पर्यंत पांच वर्षे त्यांनी महाराष्ट्र रणजी ट्रॉफी संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने १९८६ मध्ये तालीम करंडक जिंकला होता.१९७८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध २२ वर्षाखालील वयोगटातील भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही त्यांची निवड झाली होती.१९७४ मध्ये झिम्बाब्वे दौर्यावर गेलेल्या यंग इंडिया टीम मध्ये हरारे येथे झालेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून मिलिंद गुंजाळ होते. मुंबई मध्ये १९८० ते १९९४ या काळात टाटा स्पोर्ट्स क्लब साठी ते खेळले. त्याच प्रमाणे ते १९८७ ते १९८९ अशी तीन वर्षे टाटा स्पोर्ट्स क्लब साठी कर्णधार म्हणून राहिले त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा स्पोर्ट्स क्लबने १९८८ मध्ये टाइम्स डिव्हीजन किताब जिंकला होता.युके मध्ये सात वर्षे आणि केनिया मध्ये एक वर्ष व्यवसायिक लीग क्रिकेट मध्ये ते खेळले आहेत.प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये १९९३ मध्ये प्रथम श्रेणीतून निवृत्त झाल्यावर युके मध्ये सात वर्षे व्यवसायिक लिग क्रिकेट खेळत असताना कोलरीन इंन्सिटट्यूट बुशमिल्स स्कूल आणि नॉर्दन आयर्लंड मधील काही शाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून ही त्यांनी काम केले आहे.२०१२ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दरम्यान दूरदर्शन वरील क्रिकेट चर्चासत्रात ही ते सहभागी होते. १९९४मध्ये महाराष्ट्र संघाच्या १९ वर्षे वयोगटा खालील संघासाठी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. श्रीलंका व न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघा च्या स्थानिक व्यवस्थापनाची जवाबदारी त्यांनी उत्कृष्ट पणे पार पडली आहे.मिलिंद गुंजाळ यांनी धीरज जाधव सारखे क्रिकेटपटू घडवले आहेत.
मिलिंद गुंजाळ खेळत असलेल्याकाळी भारतीय संघा मध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळत असताना मिलिंद गुंजाळ यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. अशा प्रकारे क्रिकेट साठी उत्कृष्ट कामगिरी केलेला हा तारा कुठे तरी ढगांच्या आड लपला गेला.
(शब्बीर वस्ता रत्नागिरी)