रत्नागिरी :- (०१अगस्ट) महाराष्ट्रातील रत्नागिरी सह इतर बंदरातील गिलनेट व ट्राॅलींग फिशिंगच्या सर्व नौका आज पासून मासेमारी साठी सूरू झाल्या आहेत.पावसाने विश्रांती घेतल्या नंतर मासेमारीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तिन हजारहून अधिक नौकांना मासेमारीसाठी जाता येणार आहे.शासनाच्या निर्देशा प्रमाणे ०१ ऑगस्ट पासून मासेमारी बंदी कालावधी संपुष्टात आली आहे.बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर ट्रॉलिंग मच्छीमारी नौका मासेमारीला जाऊ शकतात.
मत्स्यव्यवसाय विभागा कडून प्राप्त निर्देशां नुसार ०१ जुन ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंदी होती, ६१ दिवसांच्या बंदी नंतर मासेमारी पुन्हा आज ०१ ऑगस्ट पासून सूरू होत आहे. रत्नागिरी, राजापूर,दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यात छोटी-मोठी २७ मासेमारी बंदरे आहेत. त्या ठिकाणी मासळी उतरवणे व नौका उभ्या करुन ठेवण्याची सुविधा आहे. नौका मालक मासेमारी बंदी कालावधीत बोटी च्या इंजिनाची देखभाल दुरुस्ती व डागडुजी, बोटीची रंगरंगोटी यासह जाळयांची दुरुस्ती व नवीन जाळयांची खरेदी इतर कामे करून घेतात. गेल्या वर्षांला मासेमारी च्या आरंभी काळात समुद्रात चक्रीवादळ तसेच खराब हवामान असल्याने मासेमारी हंगामाला विलंबाने सुरुवात झाली होती. व अनेक समस्स्या ला तोंड द्यावे लागले होते .मात्र यंदा मासेमारीसाठी वातावरण अनुकूल आहे. पाऊस ही ओसरला आहे आणि हवामान ही चांगले आहे. मच्छिमार आज मोठी आपेक्षा घेऊन समुद्रा मध्ये जात आहेत. हवामान विभागाकडून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. समुद्रात पाण्याला अजूनही करंट आहे. तरीही जिगरबाज दर्या चा राजा आज पासून मासेमारीसाठी सुसज्ज झालेला आहे