मानव गेल्या अनेक वर्षांपासून अवकाश संशोधन करत आहे. पृथ्वीवरुन चंद्रावर पोहोचला मात्र, आपल्यासोबत कचराही तिथे घेऊन गेला आहे. मानवाने आतापर्यंत केलेल्या चंद्रमोहिमाद्वारे पृथ्वीवरील कचरा चंद्रावर सोडला आहे.
या कचऱ्यामध्ये घन कचरा, मशीन, उपग्रहांचे अवशेष, मानवाचं मल-मूत्र, भाला, चिमटे, टॉवेल, ब्रश या गोष्टींचाही समावेश आहे.
मानवाने चंद्रावर नेला 200 टन कचरा
थोडक्यात काय तर मानव अगदी अंतराळात गेला तरी तिथेही कचरा मात्र, त्याची पाठ सोडत नाही. द गार्डियानच्या रिपोर्टनुसार, मानवाने आतापर्यंत चंद्रावर सुमारे 200 टन कचरा नेला आहे. यामध्ये मानवी मल-मूत्र आणि उलटीच्या पिशव्याही आहेत. अंतराळ मोहिमा संपल्यानंतर त्यामधील विविध उपकरणे, उपग्रह हा सर्व घन कचरा ठरतो.
चंद्रावरील कचरा कोणत्या प्रकारचा?
- अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अपोलो 11 मिशनद्वारे मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं. हे अपोलो यान चंद्रावर जिथे लँड झालं, त्याच्या बाजूला काही वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या पाहायला मिळाल्या.
- चंद्रावरील 200 टन कचऱ्यामध्ये अपोलो मिशनचे 5 सॅटर्न-व्ही रॉकेटचे अवशेष मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर इतर देशांच्या अंतराळयानांच्या अवशेष या कचऱ्यामध्ये आहेत.
- याशिवाय चंद्रावर रोबोटिक लँडर्स आणि रोव्हर्सचा ढिगाराही मोठ्या प्रमाणात आहे, ज्याचा आता काहीच उपयोग नाही. त्यांच्या बॅटरी संपल्या आहेत किंवा काहींचा हार्डवेअर खराब झाला आहे.
- लुना 9 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे पहिले अंतराळयान आहे. त्याचे अवशेष चंद्राच्या पश्चिम ध्रुवावर आहे.
- क्रॅश झालेल्या आणि तुटलेल्या अंतराळयानाव्यतिरिक्त, अनेक वैयक्तिक सामान देखील चंद्रावर आहे. अंतराळवीरांनी चंद्रमोहिमेदरम्यान सोडलेल्या वस्तूही तेथील कचऱ्यात आहेत.
- यामध्ये मानवी मलमूत्र आणि उलटीच्या 96 पिशव्यांचाही समावेश आहे. याशिवाय, दोन गोल्फ बॉल देखील आहेत. अपोलो-14 मोहिमेदरम्यान अंतराळवीर ॲलन शेपर्ड यांनी हे दोन गोल्फ बॉल मारले होते.
- अंतराळवीर एडगर मिशेल यांनी चंद्रावर फेकलेल्या धातूच्या रॉडही तिथे आहे, याल भाला म्हणतात.
- अपोलो-16 मोहिमेतील अंतराळवीर चार्ल्स ड्यूक यांचा त्यांच्या कुटुंबासोबतचा एक फोटोही चंद्रावर आहे. हा फोटो त्यांनी 1972 मध्ये तिथे ठेवला होता. 1972 मध्ये ते चंद्रावर पाऊल ठेवणारे 10वे व्यक्ती आणि सर्वात तरुण शास्त्रज्ञ ठरले.
- आतापर्यंत चंद्रावर पोहोचलेले 12 व्यक्ती
- 1. 1969 मध्ये अपोलो-11 मोहिमेअंतर्गत अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पोहोचले.
- 2. नील आर्मस्ट्राँगसोबत चंद्रावर पोहोचणारा बझ आल्ड्रिन हा दुसरा व्यक्ती होता.
- 3. अमेरिकेने 1969 मध्येच अपोलो-12 मिशन पाठवले होते. त्यात पीट कॉनरॅड आले होते.
- 4. अपोलो-12 मिशनमध्ये ॲलन बीन देखील कॉनरॅडसोबत होते. 7. डेव्हिड अपोलो-15 मिशन अंतर्गत स्कॉडमध्ये गेला होता.
- 5. ॲलन शेपर्ड 1971 मध्ये अपोलो-14 मिशन अंतर्गत गेले होते.
- 6. एडगर मिशेल देखील शेपर्डसोबत गेला.
- 8. जेम्स इर्विन देखील अपोलो-15 मोहिमेवर गेला होता.
- 9. अपोलो-16 मोहिमेत जॉन यंग चंद्रावर पोहोचला.
- 10. चार्ल्स ड्यूक देखील अपोलो-16 मिशनमध्ये यंगसोबत होते.
- 11. अपोलो-17 मोहिमेत यूजीन सर्नन पोहोचले.
- 12. त्याच्यासोबत हॅरिसन स्मिथ देखील होता.