रत्नागिरी दि २५आॅगस्ट: उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार २६ ऑगस्ट रोजी पहाटे ३.५० वाजता कोंकण कन्या एक्सप्रेसने चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, चिपळूण, जि.रत्नागिरी कडे प्रयाण. पहाटे ४.१० वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण, जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता तिवरे (भेंदवाडी) धरणग्रस्त कुटूंबियांच्या घरासंदर्भात बैठक (स्थळ: शासकीय विश्रामगृह, चिपळूण, जि. रत्नागिरी). सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद) संदर्भात आढावा बैठक.( स्थळ: शासकीय विश्रामगृह, चिपळूण, जि. रत्नागिरी).सकाळी ११ वाजता शिवसेना आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यास उपस्थिती
(स्थळ : स्वामी मंगल कार्यालय, बहादूरशेख नाका, चिपळूण, जि. रत्नागिरी) दुपारी १२.३० वाजता चिपळूण येथून मोटारीने नावडी, ता. संगमेश्वर कडे प्रयाण. दुपारी १.३० वाजता शिवसेना संपर्क कार्यालय येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राखीव (स्थळ : नावडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) दुपारी २.३० वाजता नावडी येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी ३.३० वाजता नरबे गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : नरबे, ता.जि.रत्नागिरी). सायंकाळी ४.३० वाजता लाजूळ गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: लाजूळ, ता. जि. रत्नागिरी) सांयकाळी ५.३० वाजता तरवळ गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ:तरवळ, ता. जि. रत्नागिरी. सांयकाळी ६.३० ते ७ वाजता राखीव. सांयकाळी ७ वाजता जाकादेवी पंचक्रोशी कुणबी विकास मंडळ संदर्भात बैठक (स्थळ: किसान भवन, जाकादेवी, खालगांव, रत्नागिरी). रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
रविवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ३७ वी वार्षिक अधिमंडळ सभा, निवृत्त सभासदांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ(स्थळ : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्या., प्रधान कार्यालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी). सकाळी ११ वाजता कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविलय, रत्नागिरी उपकेंद्र आढावा बैठक तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा. (
स्थळ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविलय, रत्नागिरी उपकेंद्र, अरिहंत मॉल, एस. टी. स्टैंड
समोर, रत्नागिरी) सकाळी ११.३० वाजता कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविलय, रामटेक, रत्नागिरी उपकेंद्र आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राध्यापक
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविलय, रत्नागिरी उपकेंद्र, अरिहंत मॉल, एस.टी. स्टैंड समोर, रत्नागिरी) दुपारी १२ वाजता रत्नागिरी नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. २, (लोकमान्य टिळक विद्यालय) ची पुनर्बांधणी करणे या विकास कामाच्या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : नगरपरिषद शाळा क्र. २ परिसर, रत्नागिरी). दुपारी १ वाजता काळबादेवी येथील रामेश्वर मंदिरातील नामसप्ताह सोहळ्यास भेट. दुपारी १.३० ते २ वाजता राखीव. दुपारी ३.३० वाजता पानवल गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : पानवल, ता.जि.रत्नागिरी) दुपारी ४.३० वाजता पोमेंडी बु. / कारवांची वाडी गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : पोमेडी बु./कारवांची वाडी, ता. जि. रत्नागिरी).सांयकाळी ५.३० वाजता कुंवारबाव गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : कुंवारबाव, ता.जि. रत्नागिरी). सायंकाळी ६.३० वाजता नाचणे गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : नाचणे, ता.जि. रत्नागिरी) सांयकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ १०.४० वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्रौ १०.५५ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व कोंकणकन्या एक्सप्रेसने ने मुंबई कडे प्रयाण.