‘स्टार न्यूज़ कोकण’संपादक : शब्बीर वस्ता
मजगाव (रत्नागिरी):रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील इब्जी कुटुंबाने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे. मजगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरीफहसन इब्जी यांची कन्या कु. सलमा इब्जी हिने नर्सिंग क्षेत्रात उत्तम रुग्णसेवा प्रॅक्टिस आणि अभ्यासाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे, इब्जी कुटुंबात यापूर्वीच तीन डॉक्टर घडले असून, आता सलमाच्या रूपाने नर्सिंग क्षेत्रातही यश मिळवल्याने कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.सलमाच्या या यशाबद्दल मजगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक फय्याज मुकादम, समाजसेवक एजाज इब्जी, मुजफ्फर मुकादम, जहीर मुकादम, जमातुल मुस्लिमीन मजगांवचे माजी उपाध्यक्ष मकबूल मुकादम, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष ताजुद्दीन खलफे, नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आपल्या यशाचे श्रेय सलमाने आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक असलेले डॉक्टर भाऊ, बहीण, वहिणी तसेच सेवानिवृत्त शिक्षिका आत्या फरीदा हकीम यांच्या मोलाच्या सहकार्याला दिले आहे. इब्जी कुटुंबाच्या या शैक्षणिक यशाबद्दल संपूर्ण मजगाव परिसरातून तिच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
