रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथील जनसंपर्क कार्यालयात आज जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून मंत्री उदय सामंतांने घेतल्या. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने योग्य कार्यवाही करून हे प्रश्न मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
या जनसंपर्क कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. बंड्या साळवी आणि शहरप्रमुख श्री. बिपिन बंदरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी आपल्या विविध मागण्या आणि तक्रारी यावेळी मांडल्या.
याप्रसंगी बोलताना सांगण्यात आले की, “जनसंपर्क म्हणजे केवळ नागरिकांच्या भेटीगाठी घेणे नव्हे, तर त्यांच्या समस्या मुळापासून समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे, हीच आमची मुख्य भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, त्यांच्या प्रश्नांना वेळेत न्याय मिळावा आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
जनतेचा विश्वास हीच कामाची खरी ऊर्जा असून, नागरिकांच्या समस्या सोडवणे हीच आपली जबाबदारी असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळणार असल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
जनतेच्या प्रश्नांना प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद; जयस्तंभ जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांची तात्काळ दखल
Leave a Comment
