दारव्हा:
तालुक्यातील मागकिन्ही येथे तलावाची पाहणी आणि मच्छीमारांशी संवाद साधण्यासाठी आलेले मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यादरम्यान ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी मंत्री राणे यांच्या ताफ्यावर थेट कोंबड्या फेकून आंदोलन केले.
दारव्हा तालुकाप्रमुख रवी तरटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मंत्री राणे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मागकिन्ही येथील तलावाची पाहणी करण्यासाठी मंत्री राणे आले असताना, ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मच्छीमारांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला लक्ष्य केले. “मच्छीमारांबाबत एवढीच सहानभूती असेल, तर त्यांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई आणि ठोस मदत जाहीर करा,” अशी आक्रमक मागणी या वेळी आंदोलकांनी केली.
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकून ठाकरेंच्या शिवसेनेचा निषेध
Leave a Comment
