मुंबई:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘टीम शिवसेना’ सज्ज केली आहे. कोकणच्या विकासासाठी आणि पक्ष विस्तारासाठी आमदार किरण सामंत यांच्यावर विश्वास टाकत त्यांना दक्षिण कोकणची जबाबदारी देण्यात आली आहे. सामंत यांच्या या नवीन इनिंगमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
किरण सामंत यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार असून, आगामी काळात पक्ष संघटनेला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विभागीय जबाबदाऱ्यांचे वाटप:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून यामध्ये अनुभवी नेत्यांना संधी दिली आहे:
दक्षिण कोकण (रत्नागिरी-सिंधुदुर्ग): आमदार किरण सामंत
उत्तर कोकण (रायगड-पालघर): मंत्री भरतशेठ गोगावले
पश्चिम महाराष्ट्र: श्री. दगडू दादा सकपाळ
मराठवाडा: मंत्री प्रकाश अबिटकर
पूर्व विदर्भ (नागपूर बेल्ट): मंत्री डॉ. दीपक सावंत
पूर्व विदर्भ (वर्धा-गडचिरोली): आमदार डॉ. मनीषा कायंदे
पश्चिम विदर्भ: मंत्री संजय राठोड
