चिपळूणमध्ये भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश

Shabbir Vasta
1 Min Read

आरवली (विशेष प्रतिनिधी) :
चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. चिपळूण शहरातील हॉटेल साईशा येथे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.
भाजपचे माजी पदाधिकारी गणेश नलावडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दीपक खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये प्रामुख्याने दळवटणे, वालोपे, निरबाडे आणि वालोटी परिसरातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पक्षप्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना कीर्तनकार ह.भ.प. तांबिटकर महाराज आणि प्राध्यापक टेरवकर यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. “पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद दिली जाईल आणि त्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा राहील,” असा विश्वास जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी या वेळी दिला.
या कार्यक्रमास मनसे माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस रविकांत काणेकर, शेतकरी सेनेचे जिल्हा सचिव जितेंद्र महाडिक, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, तालुका सचिव संदेश साळवी, महिला उपाध्यक्षा शोभा पावसकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ निवेदक शहीदभाई खेरटकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *