मिरकरवाडा आदर्श मच्छीमार संस्थेचे माजी चेअरमन हाजी सुलेमान मुल्ला यांचे निधन*

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी (शब्बीर वस्ता):
खडप मोहल्ला, मिरकरवाडा येथील रहिवासी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी सुलेमान बाबामिया मुल्ला यांचे आज, रविवारी (२७ सप्टेंबर २०२६) पहाटे फजरच्या नमाजपूर्वी वयाच्या ७२ व्या वर्षी राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मिरकरवाडा व रत्नागिरी परिसरात शोककळा पसरली आहे.
हाजी सुलेमान मुल्ला हे मिरकरवाडा आदर्श मच्छीमार सहकारी संस्थेचे माजी चेअरमन होते. त्यांनी मिरकरवाडा आणि रत्नागिरीतील मच्छीमारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मिरकरवाडा बंदरात दरवर्षी साचणाऱ्या गाळाचा प्रश्न गंभीर बनला असताना, त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. मच्छीमारांच्या हक्कांच्या मागण्यांसाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते वारंवार मुंबई व दिल्ली दरबारी जात असत.

व्यवसायासोबतच त्यांनी धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला होता. ते मिरकरवाडा जामा मस्जिद आराकीन कमिटीचे सदस्य तसेच  हुसैन पीर दर्गा कमिटीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यतत्पर व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अल्लाह ताला त्यांना जन्नत-उल-फिरदौसमध्ये उच्च स्थान प्राप्त करून देवो आणि त्यांच्या शोकाकुल परिवाराला हे दुःख सहन करण्याचे धैर्य देवो, हीच प्रार्थना.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *