मिरकरवाड्यात नगर परिषद कर्मचाऱ्याचा ‘हायव्होल्टेज’ ड्रामा; महिला कामगाराच्या उर्मटपणाने नागरिक हैराण!

Shabbir Vasta
2 Min Read

कामगार की ‘लेडी डॉन’? कचरा टाकणाऱ्यांचे फोटो काढून महिला कर्मचाऱ्याची थेट दमदाटी!


रत्नागिरी:
शहरातील मिरकरवाडा भागात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनत असतानाच, आता नगर परिषदेच्या एका महिला कर्मचाऱ्याच्या उर्मट वागणुकीमुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतापले आहेत. कचरा टाकण्यावरून नागरिकांना दमदाटी करणे, त्यांचे फोटो काढून धमकावणे असे प्रकार या महिला कर्मचाऱ्याकडून घडत असून, तिची तत्काळ बदली करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकप्रतिनिधींचे प्रयत्न, पण कचरा फेकणाऱ्यांमुळे मनस्ताप
मिरकरवाडा भागातील नगरसेवक सुहेल साखरकर आणि नगरसेविका आफ्रीन होडेकर हे प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. स्वतः फिरून कचरा साफ करून घेण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र, काही बेजबाबदार नागरिक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कचरा कुंडीत न टाकता बाहेर रस्त्यावर फेकतात. यामुळे सकाळी कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

मोकाट जनावरांचा विळखा आणि अपघाताची भीती
कचरा कुंडीच्या बाहेर पसरलेला असल्याने त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा आणि बैलांचा राबता वाढला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना कुंडीपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीला बैलाने उडवल्याने गंभीर दुखापत झाली होती, ज्यात संबंधित व्यक्तीला सहा महिने अंथरुणाला खिळून राहावे लागले. अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून कुंडीपर्यंत कसे जायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

महिला कामगाराची अरेरावी आणि धमक्या
कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक महिला कर्मचारी सातत्याने नागरिकांशी वाद घालत असल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यावरून नागरिकांना समज देण्याऐवजी ही महिला उर्मट भाषेत बोलून त्यांना दमदाटी करते. इतकेच नव्हे तर नागरिकांचे मोबाईलमध्ये फोटो काढून त्यांना विनाकारण धमकावण्याचे प्रकारही सुरू आहेत. या महिलेच्या वागणुकीबद्दल स्थानिक नगरसेवकांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

नगरसेवकांचे आवाहन
या पार्श्वभूमीवर नगरसेवक सुहेल साखरकर व नगरसेविका आफ्रीन होडेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी कचरा कुंडीतच टाकावा आणि नगर परिषदेला सहकार्य करावे. मात्र, त्याच वेळी उद्धट वागणाऱ्या संबंधित महिला कर्मचाऱ्याला प्रशासनाने कडक समज द्यावी किंवा तिची बदली करावी, अशी आग्रही मागणी मिरकरवाड्यातील जनतेने केली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *