रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या ‘श्री महालक्ष्मी मिनी मॉल’ला आज पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. पहाटेच्या वेळी लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले असून इमारतीमधून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडत होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नगर परिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांच्या साहाय्याने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पहाटे लागलेली ही आग सकाळी ११ वाजेपर्यंत धुमसतच होती.
या आगीमध्ये मॉल व परिसरातील दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली शॉर्ट सर्किटमुळे की अन्य कारणाने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी आणि नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीचे नेमके कारण आणि एकूण नुकसानीचा आकडा प्रशासकीय पंचनाम्यानंतरच स्पष्ट होणार असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
रत्नागिरीतील मुख्य रस्त्यावरील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ला पहाटे भीषण आग; धुराचे लोट, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
Leave a Comment
