रत्नागिरी:
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या (MSBTE) कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरी येथे शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील थिबा पॅलेस शेजारील एमएसबीटीई कौशल्य विकास केंद्रात सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० या वेळेत पार पडेल.
या मेळाव्यात अनेक नामांकित कंपन्या एकाच छताखाली सहभागी होणार असून, १५० हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. उमेदवारांना तात्काळ नोकरीच्या ऑफर्स तसेच करिअर मार्गदर्शनाची संधी येथे उपलब्ध होणार आहे.
पात्रता आणि अटी:
* वय मर्यादा: १८ ते ४० वर्षे
* शैक्षणिक पात्रता: १० वी पास, १२ वी (कला, वाणिज्य, विज्ञान), पदवीधर (B.A., B.Com., B.Sc.) तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेले उमेदवार (ITI, Diploma, BE, Agri) अर्ज करू शकतात.
आवश्यक सूचना:
मेळाव्यासाठी येताना उमेदवारांनी आपल्या अद्ययावत रिझ्युमेच्या (CV) ५ ते ६ छापील प्रती, मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी फॉर्मल ड्रेस अनिवार्य आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी पूर्णपणे विनामूल्य असून इच्छुकांनी www.pathsaathi.com या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी ऋत्वेज शिरधनकर (7875275902 / 9028985027), अमेय मुल्ये (9404330003) किंवा प्रशांत राऊत (9960792189) यांच्याशी संपर्क साधावा किंवा थेट केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

