रत्नागिरीत उद्या रंगणार ‘आश्रय’ ज्येष्ठ नागरिक संघटनेचा स्नेहमेळावा; आरोग्य शिबिर आणि मनोरंजनाची मेजवानी

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी आणि आरोग्यासाठी कार्यरत असणाऱ्या ‘आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना, रत्नागिरी’च्या वतीने उद्या, शनिवार दिनांक १६ मे २०२६ रोजी विशेष स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाट्ये येथील सुरुबन येथे सायंकाळी ४:३० ते रात्री ८:३० या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
दैनंदिन जीवनशैलीतून थोडा वेळ बाजूला काढून ज्येष्ठ नागरिकांना मनमुराद गप्पा, मनोरंजन आणि विचारांचे आदानप्रदान करता यावे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
      ऑर्केस्ट्रा फेम अल्ताफ मिरकर आणि त्यांची टीम बहारदार सादरीकरण करणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांमार्फत जुनी गाणी, शेरो-शायरी आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातील. मेळाव्यात मोफत जनरल आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, वयोश्री योजना आणि वयंवंदना योजनांचे फॉर्म भरून घेण्याची सुविधा उपलब्ध असेल. लाभार्थ्यांनी सोबत आधार कार्ड आणणे अनिवार्य आहे.
       या मेळाव्यात दरवर्षीप्रमाणे चहा, नाश्ता आणि भोजनाची उत्तम सोय करण्यात आली आहे. रत्नागिरीतील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संघटनेचे सुहेल मुकादम, शकील गवाणकर, पराग भाटकर आणि सचिन शिंदे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *