चिपळूण :
महाराष्ट्र राज्य शासन अनेक वर्षे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरित आहे . मात्र प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना सर्व पुस्तकेच प्राप्त होत नाहीत. हे आता नित्याचेच झाले आहे. पहिल्याच दिवशी अर्धवट मोफत पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम करून उर्वरित पुस्तकांची विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक वाट पहात असतात. पुस्तके कमी जास्त माहिती संबंधित शाळांकडून दर चार दिवसांनी माहिती मागविण्यात येते. मात्र प्रथम सत्र उलटे पर्यंत उर्वरित पुस्तके येतच नाहीत. हा विद्यार्थी, पालक शिक्षक तसेच शिक्षण प्रेमी व्यक्तींचा मागील अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
जिल्ह्यात शिक्षण विभागाने या वर्षी ही अर्धवट पुस्तक वाटप करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या वर्षी ही विद्यार्थ्यांना पुस्तके अर्धवटच पुस्तके मिळणार आहेत. या वर्षी ही जिल्ह्यात पाठ्यपुस्तकांचे संच कमी प्रमाणात प्राप्त झाले असल्याचे माहिती मिळत आहे.
शासनाने मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्याचे निश्चित झाल्यापासून पुस्तक विक्रेत्यांनी पुस्तके विक्री बंद केली . त्यामुळे पालक आपल्या पाल्यांना पुस्तके खरेदी ही करु शकत नाहीत. अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास खुंटला जात आहे.
शासनाला आम्हा गोरगरिबांच्या मुलांना शिकवायचे आहे की नाही असा जनतेला विचार पडला आहे. आता तरी जिल्ह्यातील अधिकारी , पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. सामान्य जनता आपल्या कडे आशेने पाहत आहे. या बाबत समाजसेवक एजाज इब्जी यांनी विद्यार्थ्यांवरील अन्याया विरोधात आवाज उठविण्याचे ठरविले आहे.
मोफत पाठ्यपुस्तक वाटप विद्यार्थ्यांची तसेच पालकांची क्रूर चेष्टा , समाजसेवक एजाज इब्जी
Leave a Comment
