गुहागरच्या सुपुत्राची मोठी भरारी! मळण गावचे दिलीपराव जाधव यांची दिल्ली अँटी करप्शन बोर्डाच्या कोकण विभागीय जनसंपर्क अधिकारी पदी निवड

Shabbir Vasta
1 Min Read

गुहागर:
आनंदीबाई पेशवे यांचे माहेरघर असलेल्या गुहागर तालुक्यातील मळण गावचे सुपुत्र दिलीपराव जाधव यांची राजधानी दिल्ली केंद्रातून अँटी करप्शन बोर्डाच्या कोकण विभागीय पब्लिक रिलेशन ऑफिसर (जनसंपर्क अधिकारी) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या गौरवशाली निवडीमुळे कोकण परिसरातून आणि विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


दिलीपराव जाधवांचा थक्क करणारा प्रवास:
सामाजिक कार्याची पावती: त्यांनी आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा विचारविनिमय करूनच त्यांना या उच्चपदाचा बहुमान प्राप्त झाला आहे.
विविध स्तरांवर नेतृत्व: दिलीपराव जाधव यांनी आजपर्यंत गावपातळीपासून ते तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि दिल्ली केंद्रस्तरीय विविध संघटनांमध्ये प्रमुख पदांवर अत्यंत यशस्वीपणे काम केले आहे.
उत्कृष्ट कार्यपद्धती: प्रत्येक क्षेत्रातील जबाबदारी त्यांनी आपल्या कार्यकुशलातेने आणि उत्तम कार्यपद्धतीने पार पाडली असून, याच कर्तृत्वाची पावती म्हणून त्यांना ही मोठी संधी मिळाली आहे.
     मळण गावचे नाव संपूर्ण कोकणात आणि राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केल्याबद्दल राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटून दिलीपराव जाधव यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *